राज्य नाटयस्पर्धेत ‘गटार’ प्रथम; आठ पारितोषिकांचे मानकरी

राज्य नाटयस्पर्धेत ‘गटार’ प्रथम; आठ पारितोषिकांचे मानकरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बहुजन रंगभूमीच्या शिरपेचात मानाचा तुरा_

नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य संचालनालय, मुंबई तर्फे नागपूर केंद्रावर आयोजीत हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेतील प्राथमिक फेरीतून वीरेंद्र गणवीर लिखित आणि श्रेयश अतकर दिग्दर्शीत ” गटार ” हे दोन अंकी मराठी नाटक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सायंटिफीक हॉल , नागपूरला प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या कलावंतांनी सादर केलं. अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या गटारने प्रथम पुरस्कार पटकावला आहे.

बहुजन रंगभूमीची प्रस्तुती असलेल्या महाराष्ट्रातील वीरेंद्र गणवीर लिखीत आणि दिग्दर्शीत सुप्रसिद्ध नाटक ” गटार ” नाटक सफाई कर्मीच्या जीवनावर दृष्टीक्षेप टाकणारा या मराठी नाटकात स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वीपासून सफाईकर्मी समाज मुख्य प्रवाहा पासून कोसो दूर आहे. यांना गडर मध्ये काम करतांना साध्या सुरक्षा दिल्या जात नाहीत. शिक्षण, संपत्ती तसेच सामाजिक समानतेपासून अजुनही हे अनिभिज्ञ आहेत. गटारीत काम करतांना क्षणोक्षणी मुत्युशी लढा देत देशाचे स्वास्थ सुरक्षित ठेवण्यासाठी सदैव हा समाज तत्पर असतो. पण या कामामुळे त्यांचे जीवन असुरक्षित होऊन भयानक आजारपण, नशापानी , गटारीतील गैसेसमुळे होणारे आजार आणि वयाच्या आतच मुत्यु.

सदैव देशासाठी तत्पर असणा-या या समाजाची दयनीय अवस्था आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. गटार नाटकाच्या प्रथम निर्मितीच्या पुरस्कारा सोबतच दिग्दर्शनाचे प्रथम श्रेयश अतकर, अभिनयाचे रौप्यपदक आशीष दुर्गे ( रवी) भूमीकेसाठी, अभिनयाचे प्रमाणपत्र प्राची जांभूळकर, रोहित वानखेडे, नैपथ प्रथम: शिवम म्हैस्के, प्रकाशयोजना : किशोर बत्तासे, रंगभुषेचे प्रथम पारीतोषीक नेहा मून यांनी पटकावलेले आहे.

या नाटकात आशिष दुर्गे ,प्राची जांभुळकर, रिशील ढोबळे, रोहित वानखेडे , अनुष्का शेंडे आणि प्रियांक उके यांच्या प्रमुख भुमिका आहेत. पार्श्व संगीत – सौरभ कांबळे, नैपथ – शिवम मस्के , प्रकाशयोजना – किशोर बत्तासे , रंगभुषा- नेहा मुन तर रंगमंचीय व्यवस्था:- अस्मिता पाटील , उत्कर्ष तायडे,जुहील उके, हर्ष नागभिडे,सांची तेलंग, प्रतीक खोब्रागडे, अभीजीत डोंगरे,प्रित बोरकर, निखील राहांगडाले यांनी परिश्रम घेतले आहे. महाराष्ट्राच्या रंगभूमीतील सर्व स्तरातून कलावंतांचे अभिनंदन होते आहे.

सर्वोत्कृष्ट मानकरी

श्रेयश अतकर ( दिग्दर्शक प्रथम)
वीरेंद्र गणवीर ( लेखक)
प्राची जांभूळकर ( उत्कृष्ट अभिनेत्री)
आशीष दुर्गे ( अभिनेता रौप्यपदक)
रोहित वानखेडे ( उत्कृष्ट अभिनेता)
किशोर बत्तासे( प्रकाशयोजना प्रथम)
शिवम मस्के ( नेपथ्य प्रथम)
नेहा मून ( रंगभूषा प्रथम)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles