शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेत्यांचा रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : वर्षारंभ☄*
*🍂शनिवार : ३१/ डिसेंबर /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*वर्षारंभ*

रात्र संपेल दिवस उजाडेल
नववर्षाचा दिन येईल उद्या
मित्र मैत्रिणी नाते गोते सर्व
परस्परा शुभेच्छा देती उद्या

वर्षारंभ दोन हजार तेवीस
दोनहजार बावीसला बाय
उगवत्याचे स्वागत करतील
मावळत्या निरोप रीत हाय

जल्लोषात स्वागत करण्या
मोठमोठ्या पार्ट्या होतील
व्हाट्सअप फेसबुक मॅसेज
नूतन वर्षी शुभेच्छा देतील

असतील परस्पर हेवेदावे
विसरून साऱ्या वैरभावना
प्रेम आपुलकी जागृत करा
वृद्धिंगत होईल प्रेमभावना

ठेवून मनी जिद्द आकांक्षा
नववर्षाचा संकल्प निश्चय
कार्य करावे नव चैतन्याने
न बाळगता संकटाचे भय

काळ येतो काळ जातो ही
निसर्गचक्र चालूच राहणार
कधी कटू,गोड ही अनुभव
जीवनामध्ये येतच राहणार

आजचे नवे उद्या होई जूने
तिरस्कार कशाला जुन्याचा
मागच्या सारखं हेही जाईल
पुळका ही कशास कुणाचा

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*

अलवारसे गीत छेडत
स्वप्नांचे नव पंख लेवूनी
वर्षारंभ हा हसरा आला
प्रकाशलेल्या दिशांमधूनी

पर्णांकित ऋतू-वेलीवरी
फूल जसे अलगद फुलले
दिशादिशांतूनी वर्ष नवे
मधुगंध होऊनी दरवळले

मनामनातची नवोन्मषांनी
उधाण आले संकल्पांना
जुन्या नव्याला संगे गुंफूनी
जपूया मनी प्रेमभावना

मानवतेचे दीप लावूनी
विश्वशांतीचा करु गजर
सुखस्वप्नांच्या पू्र्तीसाठी
प्रयत्न करू अष्टौप्रहर

नष्ट करण्या भेदाभेद हे
मनी दृढ निश्चयची करूया
जीवनाचे सोने करण्या
हर्षाचे हे वाण वाटूया

*रचना ःवृंदा(चित्रा)करमरकर*
*सांगली, जिल्हाः सांगली*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*वर्षारंभ*

सरत्या वर्षाला देऊन निरोप
नव वर्षाचे स्वागत करु चला
मिटवून मनिच्या द्वेषभावना
क्षण एक आनंदाचा जगू चला

घडीभराचा डाव आयुष्याचा
आता जिद्दीने पुन्हा खेळू चला
अजिंक्य इथे तर कुणिच नाही
दुरावल्या मनांनाही जिंकु चला

दिवस आयुष्याचे किती उरले
हिशोब नको पुढे जाऊ चला
सत्कर्म करुनी ध्येय गाठूयात
जीवनाचे नंदनवन करु चला

नकोत भांडणे नी नको लढाया
गीत एकात्मतेचे हो गाऊ चला
शांतीमंत्र हा आता आपण सारे
साऱ्या जगताला या देऊ चला

सरले वर्ष हात धरुनी तयाचा
आनंदे त्यास विदा करु चला
देऊ हर्षे नववर्षास अलिंगन
वर्षारंभ हा साजरा करु चला

*सौ.अर्चना सरोदे*
*सिलवास,दादरा नगर हवेली आणि दमण व दिव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*वर्षारंभ*

तुमचा आमचा वर्षारंभ
गलाफाड जल्लोष असते
त्यांना जूनं काय नवीन काय
सारेच दिवस सेम असते

भेटली तर शिळी पोळी
नाहीतर उपवास असतो
उद्याची उद्या पाहू
किती ना बिनधास्त असतो

घर नाही छप्पर नाही
घेतो आकाशाची चादर
दाटीवाटीने झोपतो पुलाखाली
कोणी घेत नाही हो खबर

पाठीवर एक चुंगडी असते
नेहमी त्याच्या सोबतीला
भेटले तर ठीक नाहीतर ठीक
पण एक कुत्र असते दिमतीला

धावतो त्याच्या मागे
कधी घेतो कडाडून चावा
नकळत फुटतो टाहो
अन आईचा करतो धावा

वर्षारंभ तुम्हा आम्हा
फार नवलाई असते
आईबाबावीण पोरं
सांगा कशी हो जगते

*डॉ. संजय भानुदास पाचभाई, नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*

बघता बघता सरला डिसेंबर
वर्षारंभाच्या जल्लोषाचा
मना मनात आला बहर

गतवर्षीच्या तिष्ण-कटु आठवणी
त्यावर सोडून पाणी
मनी उमलावी मधुर लहर

गतवर्षीच्या अपयशातून
नवीन काही शिकून
सज्ज व्हावे गाठण्या, यशाचे शिखर…

या, वर्षारंभाला प्रण करूया
माणूस म्हणून प्रयत्न करूया
शांती नांदविण्या या भुवर…

*सौ वनिता गभने*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*

आले आज हे नवीन वर्ष
मनाला होतो आनंद हर्ष
करूया स्वागत कसे
हे मनी ठरवायला हवे…..

नवे वर्ष नवी स्वप्न नवा आनंद
घेऊनी येतो वर्षारंभ
नवीन स्वप्नांना साकार करायला
करूया आजचं आरंभ…….

गुलाबी पहाट सोनेरी किरणांनी
नव्या दिवसाला झालीय सुरुवात
मागील सर्व कठीण काळ विसरुनी
आपणही करूया नव्या संकटाना मात..

नवे स्वप्न नवीन अशा नव्या प्रवासाचे
करूया हर्षआनंदाने स्वागत
वर्षारंभ होताच स्वप्ने साकारूया
नव्या जोषात उत्साहात….

*सौ. सोनल शास्त्रकार अंड्रस्कर*
*भद्रावती,चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔆💫🔆➿➿➿➿
*वर्षारंभ*

जुने वर्ष संपत आले की,
चाहूल लागते नवीन वर्षाची
सर्वांना हवा हवासा वाटतो
नवीन येणारा हा वर्षारंभ

जुन्या वर्षात जे काही घडले
काही चांगले,तर काही वाईट
असते आशा नववर्षात घडावे
सर्वच चांगले नको काही वाईट

सरत्या वर्षाला निरोप देऊन
करती जल्लोषात स्वागत
पार्टी, जेवण, मेजवानी,टूर
यातच चाललेय सगळं भागतं

करूनी संकल्प नव वर्षारंभाला
वर्ष बदलती तसे संकल्प बदल
सुरवातीला काही दिवस प्रयास
नंतर चालतेय फक्त कपडे बदल

कडू गोड आठवणींना उजाळा
देऊन जातो मावळते वर्ष
मावळत्याला करून टाटा ,बाय
होत आहे नव्या उदयाचा वर्षारंभ

कीतीही कडू, गोड असले जरी
सरत्या वर्षाचे दिवस तरी म्हणती
मागच्या वर्षी पेक्षा चांगला होता
नवीन वर्ष कसं राहील म्हणती

नको हेवे दावे, नको वैर
आज जाऊन येत असतो उद्या
जसं आजचा सुर्यास्त
नव्याने उगवतं असतो उद्या

निसर्ग चक्रात अडकलेले आपण
करुनी निसर्गाचे पालण,स्वागत
तिरस्कारी भावनांना तिलांजली
येत्या नव वर्षारंभाचे मनोभावे
स्वागत, सुस्वागतम,

*प्रतिभा खोब्रागडे*
*अर्जुनी मोरगाव, गोंदिया*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles