‘जगून बघितले प्रेमात; नात्याच्या त्या पोत्यात…’!!!

‘जगून बघितले प्रेमात; नात्याच्या त्या पोत्यात…’!!!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आज ना नव्या वर्षातील दुसरा दिवस म्हणे.! म्हणजे कालचा दिवस सरला जगातील सर्वांना आनंद देऊन गेला. परवा रात्री तर धिंगाणाच होता जिकडे तिकडे चोहीकडे. पण सर्व तीन दिवसाची बेरीज करून पाहिले तर; गतसालातला शेवटचा व नवसालचा पहिला असे दोनही दिवस, नात्याच्या पोत्यात खाली रूतून बसलेले मी पाहिले. आनंद झाला मनाला की, काहीच घडले नाही त्याचा. कारण मनाला ना कान, का डोळे, ना भावना, ना संवेदना असे समजणारे स्वप्नात सांगून गेले. म्हणे पहाटेचे स्वप्न खरे ठरतात. आजवर पहाटे पडलेल़ं स्वप्न कधीच खरे झाले नाही आणि होतही नाही. माझे पक्के मत आहे. ज्याचे झाले असेल त्याचे अभिनंदन. पण या ‘थोतांड बाता’ आहेत हा विश्वास आला.

‘ऐड्याचा पसारा’ म्हणाल तरी चालेल. नात्याचं पोत़ं अजूनही तसंच ठेवलंय मी. कारण भिकारचोट मनाच्या संवेदना देवही ऐकत नाही. देवास कुठं माहित असते; तन, मन,धन याची बेरीज केली तरी उत्तर वजाबाकीत येते. ‘देवाची शाळा’ काढावी असेही वाटते अधून मधून. पण देव कुठून आणणार? हा मोठ्ठा प्रश्न पडतो. नव वर्षात अनेकांनी अनेकांना फोन केले, मेसेज केले असतीलच. पण माझ्यासारख्या रिकामटेकड्यास ना फोन आला ना मेसेज. देवालाच वाटले असेल याची मज्जाच घ्यावी. तेव्हा फोन वर शुभेच्छा दिल्या बरं वाटलं! पण त्यांना म्हटलं, आपण स्वागत करू या ना नवसालाचे. म्हणजे, पोत्यातलं नातं श्वास घेईल. पण ‘आयडीया’ नापास झाली. वाटलं भिकारछोटाचं काही खरं नसतं या जगात. कारण प्रामाणिकपणाचे ‘माप’ या जगात कोणताच शास्त्रज्ञ तयार करू शकला नाही. पुढे कुणी करेल असे वाटत नाही.

आज पुन्हा गुदमरलेलं नातं, पोत्यात भरलं आणि भल्ला मोठ्ठा दगूड दोरीला बांधला आणि पक्की गाठ बांधून पोतं बांधून ठेवलंय. कारण देवाचं लक्ष असते त्यावर. ऋणानुबंधाच्या गाठी पाडल्यात नात्याच्या पोत्यात. गाठी सोडायला गाठ होईल या आत्मविश्वासाने आजचा दिवस कसाबसा ‘दु’खात’ काढला. पण आशा कायम आहे. उरलेल्या ३६३ दिवसाची. ते सर्व उर्वरीत दिवस आनंदासाठी ठेवलेत जपून. आजचा दिवस रूसला म्हणून काय झाले?
सर्व दिवस सारखे नसतात. रूसवे, फुगवे दूर करण्यासाठीच आयुष्य आहे. म्हणून आनंदाचे दिवस सर्वांच्याच जीवनात यावेत ही ईशचरणी मनोकामना. माझं काय व्हायचं ते होईलच. पण तुमच्या कुणाच्याही आनंदावर विरजण घालण्याचा अधिकार मलाही नाही. तसे अधिकार नातं जोडणारा देवही देत नाही. हेच अंतिम सत्य…!!!

मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles