‘जाणता राजा’ फाऊंडेशनचा पास्थळ महोत्सव उत्साहात

‘जाणता राजा’ फाऊंडेशनचा पास्थळ महोत्सव उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

उर्मी (हेमश्री) घरत, पालघर

पालघर जिल्ह्यातील पास्थळ येथील युवा समूह ‘जाणता राजा फाऊंडेशन’ तर्फे दि. २४ व २५ डिसेंबर २०२२ रोजी दोन दिवसीय पास्थळ महोत्सव आंबट गोड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवासाठी पालघर जिल्हयाचे खासदार मा.राजेंद्र गावित हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष मा.विदुर पाटील होते. या दोन दिवसीय आनंद महोत्सवात बाल आनंदोत्सव, तारपा नृत्य प्रदर्शन, राॅकर्झ म्युझिकल शो, मॅजिक शो, स्पॉट गेम्स, लकी ड्रॉ सोडत, सेल्फी पॉईंट अन् महत्त्वाचे आकर्षण म्हणजे वसईकर रिदम बॅन्डसची संगीत मैफील यासह विविध ६५ स्टॉल्स धारकांनी आपल्या उपस्थितीने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. परिसरातील रसिक प्रेक्षकांनी आयोजित महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून पुढे राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती ‘जाणता राजा’ फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश सदानंद घरत यांनी प्रास्ताविकेतून दिली. जाणता राजा फाउंडेशनचे सचिव हितेश राऊत, सहखजिनदार सौरभ घरत, प्रदीप घरत, जितेश घरत, निपुल घरत, प्रजित राऊत, कृपेश पाटील, विस्मय घरत, तेजस घरत, भाविक घरत, अनुज घरत, सिद्धेश राऊत, आयुष राऊत, प्रियेश पाटील यांच्या विशेष सहकार्याने व सर्व सदस्यांच्या अथक परीश्रमाने हा महोत्सव संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मी (हेमश्री) घरत यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles