आठवांची उब जागी करणारा धुक्याचा प्रवास

आठवांची उब जागी करणारा धुक्याचा प्रवास



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण

सहा ऋतूंचे सहा सोहळे…त्यात शीतलहरींचे आगमन न्यारे..गुलाबी थंडीत हुडहुडी भरवणारे…अंगाला बोचणारे ते गार गार वारे..तृण पात्यांवर,वसुंधरेच्या कायेवर विसावणारे स्फटिकासम बर्फाचे रूप ते प्यारे…सूर्यनारायणही गर्द धुक्यांनी झाकोळे..दृष्टीला चकवणारे ते धुक्याचे नजारे..पण सृष्टीला सजवणारे ते पांढरे शेले..खरंच किती मोहक ना सारे!!!

शेकोटीपुढे
आठव उजळती
मने जुळती

खरंच..शरद ॠतूनंतर व वसंत ॠतू आगमनाच्या आधीची ही थंडी किती शराबी..नि तेवढीच हाडं गोठवणारी..धुक्याची ही रजनी प्रसवताच पेटते मग उबदार शेकोटी..शेकोटी पेटायला लागताच तिच्या उबेत तनमन धाव घेते.. तिच्या सभोवती घरातील सुखदुःखाच्या संवादधाग्यापासून ते राजकारणातील गप्पांपर्यंत मनाचा फड रंगतो..जातधर्म विसरून एकोप्याने शेकोटीची उब घेत मनातील अनेक वैचारिक भावनांना उधाण येतं..प्रेम भावनेच्या अनेक गहिऱ्या छटा उजागर होतात.ईर्ष्या,असूया, मत्सर सारेच थंडावतात, स्नेहाच्या उबेत मने जवळ येतात.या स्नेहओलाव्यात मित्रासमोर उरात साचलेल्या वेदना बाहेर पडतात, एकमेकांच्या खांद्यावर विसावतात.मनातील नाती फुलतात, वर्षे उलटून गेलेली पण थंडीतली शेकोटी पेटली की वृद्धांच्या मनातही काळाआड लोपलेल्या खुणा,काही तृप्तीच्या तर काही निसटलेल्या क्षणांच्या जाग्या होतात..चीर तारुण्याची अनुभूती करून देणारी, आठवांची उब जागी करणारी, अशी ही शेकोटीची उघडझापच न्यारी.

कधी कधी अती धुक्यामुळे बराच वेळ धुक्यात गुरफटून पडणारी वाट शैथिल्य आणते.. पण तेही एका दृष्टीने बरंच काही शिकवून जाण्यासाठीच जणू..सतत वेगावर स्वार होऊन केलेला वाहनप्रवास कधी आपल्यावर वाहन स्वार होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच की काय आपला वेग धुक्यामुळे मंदावते.व काही काळासाठी मंदावलेला हा वेग निवांतपणा देऊन जातो, या निवांतपणात शेकोटी पेटवून खूप काही साधता येतं. हा हात शेकत विसावणारा वेळ..मायेची उब देणारा व मनभावन ॠतू सृष्टीची अनोखी रुपे दावणारा..थंडावलेल्या शेकोट्यांच्या उबेत जगण्याची प्रेरणा देणारा.

गुलाबी थंडी
आठवांची पेटली
उर्जेत न्हाली

अशी ही उर्जादायी शेकोटी कधी आनंदवनात तर कधी हेमलकसाच्या रानाला प्रकाशमान करणारी,रंक व धनवानाला,सान थोरांना सारखीच उर्जा देणारी,मनामनाला सुखद संवेदनेनी जोडणारी,गुलाबी थंडीत आठवांना उजळणारी व मनात चैतन्य निर्माण करणारी,समतेची रुजवणूक करणारी,आपल्या शिलेदारांची लेखणीही त्या शेकोटीसम साहित्यात स्वउर्जाबळाने प्रकाशमान व्हावी म्हणून कदाचित आदरणीय राहुल सरांनी हे चित्र दिलेलं…सर्वांनी त्यावर खरे उतरण्याचा प्रयत्न केलाय ..सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन..

थोडसं मनातलं: तिसऱ्या ओळीत कलाटणी देताना शब्दसौष्ठवाने व्यापक आशयाची अनुभूती येऊ द्या…!!

प्रा. तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव, जि गोंदिया
मुख्य परीक्षक ,सहप्रशासक, कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles