शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : अश्रूंचे संदर्भ☄*
*🍂शनिवार : ०७/ जानेवारी/२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अश्रूंचे संदर्भ*

अश्रूंचे संदर्भ मजला
जाती खूप काही सांगून….
जगण्यासही जाती ते
खूप काही शिकवून…

नको राहू तू अबोल
बन शिवबाची तलवार…
जीवनाचा हा पाडाव
कर तू म्हणे पार….

जग झाले दुर्योधन
घाली पदरास हात…
होवूनी तू भिमराया
म्हणे घालीस लाथ….

जग झाले आंधळे
सगळे वाचाळ वीर….
नाही कुणाचे कुणी
देती ना मानवा धीर….

बोल बोलती मुके
हे अश्रूंचे संदर्भ…
जगण्यातील दाखवी
अंतरीचा तो गर्भ…

ऊठ पेटून तू मानवा
चाल एकलाच पुढे….
असेल जर हिंमत तर
पडतील कौतुकाचे सडे….

*सौ.सविता पाटील ठाकरे*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©️समूह प्रशासक मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

भयाण शांतता,
पसरली,
घरा-दारात…..,
पक्षीही,
मुक,
विहरती शिवारात……!
गावही,
सुन्न,
पाहूनी “घटना”…..,
“आता” भेट देती,
साऱ्याच,
पक्ष-संघटना……..!
चिल्ल्या-पिल्ल्यांच्या,
नयनांतील,
गोठले अश्रू……..,
व्यवस्थाही तयार,
ढाळण्यास,
नक्राश्रू…………!
जेंव्हा,
अश्रूंचे संदर्भ,
वदते घरधणीन……..,
अश्रूंचे अश्रूही,
गोठती पापण्यांत,
पाहूनिया “सवाष्ण” अभागीन..!!!

पाहूनिया “सवाष्ण” अभागीन..!!!

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*अश्रुचे संदर्भ*

डोळ्यांतील अश्रुंचे,
पाण्यात मिसळा रंग ll

प्रतिबिंब दिसेल तेव्हां
मुखावरी उठती तरंग ll

नभातूनी पडता पाणी
भरून वाहती नद्या नाले ll

टपोरे थेंब पाहुनी सारे
पाणी,पाणी म्हणती ll

दुष्काळाचे सावट गेले दूर
लोचनी चमकती आसूं सारे ll

रंगात रंगुनी गेले सारे
सुखांत चिंब झाले सारे ll

जीवनात राहु दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग ll

अनेक विध अश्रुंचे संदर्भ
दडती पृथ्वीच्या गर्भात ॥

*© श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

विश्वाच्या उत्पत्ती नंतर
जेंव्हा मानव जन्मला
तेंव्हाच असावे अश्रूही
त्याच्या साथ सोबतीला
नव्हती भाषाही जेंव्हा,
तेंव्हा ही असतील अश्रू
डोळ्यांतून पाझरत
कसे असतील समजत
तेंव्हा अश्रूंचे संदर्भ?
अश्रू ही अनाकलनीय
निर्मिती च ना विधात्याची
भावनांचा निचरा करून
मनाला शांती देणारी
कधी असती आनंदाचे
तर कधी दुःखातिरेकाचे
अश्रू असतात एखाद्या
सच्च्या मित्रासारखे
सदैव आपल्या जवळ
पापण्यांच्या पल्याड.
मुक्या प्राण्यांच्या, झाडांच्या
डोळ्यांतून ही झरत असतील अश्रू
आपण पुसूया का त्यांच्या
डोळ्यांतले अश्रू?
दुःखितांचे अश्रू, अनाथांचे
दीनदुबळ्यांचे अश्रू?
जाणून अश्रूंचे संदर्भ|

*रचना ःवृंदा(चित्रा)करमरकर*
*सांगली,जिल्हा ःसांगली*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार सांगली.*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*”अश्रूंचे संदर्भ “*

किती द्रुष्टांत अन् दाखले
बघतोय आपण आसवांचे
सुख आणिक दुःखातही
दिसतात नयनी प्रत्येकांचे

कधी आनंदाश्रू होवून
झलकती हे नयनातून..!
तर वाहती कधी अश्रू
दुःखाच्या ते प्रसंगातून..!

होताच जन्म प्रत्येकाचा
जणू देती परिचय अपुला
रडण्याचा संकेत मिळता
द्रुष्टीस पडती या जगाला

लहानपणी चालत असता
वेदनेसोबत अश्रूंच्या धारा
लागते ठोकर जाता येता
सतर्कतेचा देतात इशारा

कारण निमित्त बरेच काही
अश्रूंना मात्र…थारा नाही
कधी अलगद येती नयनी
वाहती धारा गंगा बणूनी..!

अश्रूंचे संदर्भ द्यावेत किती ?
प्रसंग आला की वाटते भिती
अश्रूंची कहाणी केविलवाणी
प्रत्येकांच्या असते जीवनी..!

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना २.०० पूर्वी पाठवावे. (सूचना: ३१ मार्च रोजी ज्यांचे वार्षिक सभासदत्व संपले आहे. अशा सभासदांनी पुनर्नोंदणी करावी. २.०० नंतर छायाचित्र पाठवून समुहाचा अपमान करू नका)*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

आनंदाश्रू की दुःखाश्रू
कडा पाणावल्या थेंबानी
यातनेचे वेदनेचे सांत्वन
डबडब भरले लोचन आसवांनी
फुसले अश्रू दस्तीने बाबानी !!

अश्रूंचे संदर्भ स्पष्ट करु
ओघळले गाली मर्म
लाडक्या लेकीला जवळ
घेत म्हटले नको हुंदके देऊ
अन् रडूस सांग बाळ सारं वर्म !!

आकस्मिक होते निमित्य
गहिवरलेला बांध ओसांडतो
दलदल झाली हृदयी माझ्या
धारांनी पाझरते मन सरीता
कधी हा महापूरं ओसरतो !!

दाटुन कंठ येतो आई
ओलली जलाने राई
विरहाचे भोग सहवेना
सावरण्याची कोसिश केली
अनावर होते लेकुर हिताई !!

*प.सु. किन्हेकर*
*वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

दाटती अश्रुंचे पानावलेले,
त्या सुखदुःखाच्या ओलावा,
उंबरठ्यावरचे माप ओलांडून,
आईबाबांची लाडाची लेक,
जा पोरी दिल्या घरी सुखी रहा,
गहिवरून येतो, अश्रुंचे संदर्भ,

अडीअडचणींना वाव देऊनी,
सरसावल्या त्या वाटा वळत,
मनातल्या काळजातल सागुं,
भिरभिरत्या पापणीत साभांळी,
दिसतात ते डोळ्यातले अश्रू,
सांग पोरी कस, काय, ठीक
अश्रुंचा संदर्भ कळला,

घरातल किलबिल पाखंराच
घर सुन सुन का, अश्रु सांगतात
कधी आनंदाचे अश्रुंचे संदर्भ
सुखदुःखे उफाळून येई थागं नसे,
साडुं दे अश्रुं मन तुझे हलकेसे,
कधी येतो हवा, पाऊस, ऊन,
अश्रुंचे संदर्भ सांगतो,

जो रात्रंदिवस काबाडकष्ट करी,
पचवून घेई अश्रुंचा ओला, सुखा,
घास, त्याच्या पाशी नाही वेळ,
ज्याचा त्याच्या नशिबात नाही,
अश्रुंचा संदर्भ

*सौ. नंदा कामडी*
*चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

अश्रूंचे संदर्भ
कसे मी देऊ
जन्मापासून जे
सोसले मी भाऊ

मूलीचा जन्म जो
नको समाजाला
मूलगाच हवा
दिवा तो वंशाला

पणतीचे मोल
नाही ते जाणले
गर्भात खुडणे
कर्तृत्व हे ह्यांचे

स्वतःच्या सोयीने
चुलीशी जुंपले
बाहेरचे जग
नाही दाखविले

अश्रूंचे हे नाते
जन्माने जोडले
भूमिकेत सर्व
अश्रूच सांडले

अश्रूंचे संदर्भ
मनांत जपले
पुसुन ते सर्व
जग मी पाहिले

*सौ. रजनी भागवत*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*अश्रुंचे संदर्भ*

वणवण जीवाची
सांगावी कशी कुणा
सतरा विश्व दारिद्र्य
संपती ना दुःख,वेदना

लेक झाली उपवर
काळजी विवाहाची
मायच्या मनी चिंता
पापण्या त्या ओलावती

किती मरमर करे परी
पुरे ना पैसा अडका
पाहून मुलांना उपाशी
दाटे नयनी अश्रुंचा साठा

लुगड्याला सतरा गाठी
कष्ट करून जीवाची दैना
गरीबीचा त्रास भयंकर
अश्रुंचे संदर्भ बहु जीवना

चिंता,जीवा चहुबाजुंनी
भोग कसे हे जीवनाचे
आशा सोनेरी स्वप्नांची
अश्रु ओघळती सुखाचे

पाखरं होतील मोठी माझी
येतील आनंदाचे ते क्षण
मनोमनी कल्पित समाधान
परी अश्रुंनी सजती नयन

*श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे*
साईनगर,अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

येरे येरे पावसा म्हटलं आम्ही तुला
यात आमचं काय रे चुकलं
वसुंधरेची तग मग पहावत नव्हती आम्हाला
म्हणूनच तुला येण्यासाठी विनवलं

तू ही आलास ना लगेच धावून
आणि बरसता बरसता अश्रुंचे संदर्भ गेलास ठेवून

नद्या नाल्यांच्या पुराबरोबर अश्रूंचा पूर आलास घेऊन
नको तितका सगळीकडे गेलास बरसून

वसुंधरेच्या कुशीत शिरावयाचे सोडून
तिची कुसचं गेला वांझ करून

बळीराजाचे तोंडचे पाणी पळवून
अश्रूंचा पूर गेलास मागे ठेवून

निष्पापांचा बळी घेताना नाही घाबरलास
तुझ्या सवे त्यांच्या नात्याला कसा विसरलास

पुरे कर आता अश्रूंच्या पुराची वारी
अश्रुंचे संदर्भ देता देता लागतंय सर्वांच्या जिव्हारी

*सौ अनिता व्यवहारे*
*ता श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🫐💐🫐➿➿➿➿
*अश्रूंचे संदर्भ*

काय सांगावे कुणास
अश्रूंचे संदर्भ मनातले
भाव मुके ह्रदयात
अश्रूंधुर वाहे डोळ्यातले

आयुष्याच्या मध्यबिंदूत
काटेरी वाट भोवती
इकडे आड तिकडे विहीर
घनघोर दाट जंगल वेडावती

डोळ्यांभोवती काळे वर्तुळ
मार्ग सुचेना कायकरी तरी
अश्रूंचा पूर सांभाळतो
जीवनी जपतो नानापरी

सुख दुःखात निभावती
आधार तोचि जीवनी
आकार जीवनरुपी
अश्रूंचे संदर्भ फुलवी मनी

*सौ पुष्पा डोनीवार*
बाबुपेठ चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles