
एकच ध्येय मनात
सावित्रीच्या लेकी आम्ही,
नवीन ध्येय डोळ्यात साठवू
दोन हात करू नियतीशी अन्
मरणाला ही तिथल्या तिथे गोठवू
रोजच डोळ्यांच्या पापण्यात स्वप्न
घेऊन पहाट आमची जागते
कधी तुटते कधी झिरपते कधी
थोडे स्वप्नं लिलावात निघते
पायाखाली सलती दगडाचे कण टोकेरी,
तरी ध्येय गाठण्यासाठी मन घेई उभारी
संकल्प ना कसला आमुचा तरी मनात,
नवीन आशा घेतात आभाळी भरारी
ध्येय एकच करावा नारी जातीचा,
प्रत्येकाने क्षणाक्षणाला उद्धार
उदरी तिच्या जन्म घ्यावा वीरांनी,
व्हावा तिचा पावलोपावली सत्कार.
सविता वामन ठाणे.
=======