
वडेश बहरला
नवलकाकी तनुवरती
नटून सजून आला
अंगणी नवनवा
वडेश साज ल्याला
सजवती वडफळे तयां
नववधू जशी ती
लाल फुले जणू
हिरव्या शालूवरती
पारावार न उरला
उधान आनंदा
पशुपक्षी किलबिलती
चाखती फळ स्वादा
मन माझे ही
घेई भरारी
क्षणात जाऊन बसे
लखडल्या फांदीवरी
खाता फळे मधूर
नवचेतना मनी
बसूनी वडाखाली
मन गाई गाणी
शर्मिला देशमुख, बीड
=====