
वेगळ्या वाटा
धोपट मार्गी सारेच जातात
निवडाव्यात वेगळ्या वाटा
अडगळीतूनही मार्गक्रमण
भले रुतेल ही पायी काटा
येतील कटू अनुभव वाटेने
म्हणतील लोक वेडा प्रसंगी
वेडे लोक इतिहास घडवती
वेगळाच गुण तयाच्या अंगी
मिळेल निराळीच अनुभूती
त्या वेगळ्या वाटा चालतांना
तोंडात बोट घालून बघतील
वळणावर घाटमाथा चढतांना
स्वअस्तित्व निर्माण करण्या
जिद्द चिकाटी अंगी बानावी
कठोर परिश्रम करून स्वतः
आपली वेगळी छाप पडावी
ध्येयेवेडी ध्येयाने पछाडतात
वेगळाच इतिहास घडवतात
आगळीवेगळी ओळख होते
अलौकिक नावरुपास येतात
ज्ञानतंत्रज्ञानाचे नवयुग आहे
कालपरत्वे स्वतःस बदलावे
वेगवेगळ्या वाटा निवडुनच
स्वअस्तित्व अबाधित ठेवावे
बी एस गायकवाड
ता.पालम, परभणी