जीवन
अनमोल जीवन हे
दिले आहे विधात्याने
करू नका मातीमोल
जगू या रे आनंदाने
क्षण प्रत्येक मोलाचा
लावू या तो सत्कर्मी
फळे गोड हमखास
असे विधात्याची हमी
विकारांना नको थारा
सुविचार जपू मनी
दीन,दुबळ्यांची सेवा
करी कृतार्थ जीवनी
नको अती मोह मना
धन,संपत्ती,सुखाचा
अंती जाणे एकल्याचे
गर्व नको तो फुकाचा
बोल मधुर वाणीने
उगवेल गोड नाती
बंध रेशमाचे जुळे
मनी वाढवेल प्रिती
शुद्ध विचाराने होई
आचरण ते पवित्र
वाहु दे रे अंतरात
भक्ती सरीता सर्वत्र
श्रीमती सुलोचना मुरलीधर लडवे
अमरावती
======