
शिक्षणव्रती
झळाळणारी दीपशिखा तू
तमातूनी उजळली ज्योती
स्त्रीच्या दुबळ्या मनगटातली
सावित्री झालीस तू शक्ती
अपमानाचे घाव सोसूनी
लेकींना तू दिलेस गं ज्ञान
स्त्रियांची उध्दारकर्ती तू
शिक्षणव्रती आई तू महान
दीन दुखितांची माय होऊनी
स्त्री शिक्षणाचा रचला पाया
स्वतः शिक्षित होऊनी आई
स्त्री उध्दारा झिजविली काया
सत्यशोधक समाज धुरा
सावित्री तू पतीसवे पेलली
समाजोध्दारासाठी झटली
ज्योतिबांची बनूनी साऊली
दुर्बल पंखांमध्ये बळ भरूनी
ज्ञानाचे क्षितिज केलेस खुले
अज्ञान अंधःकारी लक्षदीप
स्त्रीच्या प्रगतीने लखलखले
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हाः सांगली