स्नेहबंध जपण्या ह्रदयी गोड बोलून बघू या…!; वैशाली अंड्रस्कर

*स्नेहबंध जपण्या ह्रदयी गोड बोलून बघू या…!*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*काढू काय मी उठाबशा ?*
*पकडू का दोन्हीही कान ?*
*चुकलेमाकले असेल जरी*
*क्षमा करून दूर सारु ताण*
*सण बघा आला संक्रांतीचा*
*नाती अखंडित ठेवण्याचा…*
*चला गोड गोड हलव्यापरि*
*मधाळलेली मने फुलवू या*
*तळहातावर तीळगूळ देऊन*
*क्षणभर गोड बोलून बघू या*

*काय मंडळी…अवघी संक्रांत अंगात भिनल्यागत वाटतयं ना वरील ओळी वाचताना… माननीय राहुल पाटील यांनी शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचा दिलेला ‘गोड बोलून बघू या’ विषय बघताच उद्यावर आलेल्या संक्रांतीच्या सणाचे जणू वेध लागले. समूहातील एक एक रचना अवलोकन करीत गेले. किती किती गोड बोलण्याच्या तऱ्हा सर्व शिलेदारांच्या… वर्षभर नाही जमलं तरी संक्रातीला गोड बोलू या…इथपासून सुरू झालेला गोड गोड प्रवास…मकरसंक्रांतीपुरते कशाला..नेहमीच गोड बोलूया, हिशोब प्रेमाचे लावून गोड बोलू या, सवाष्णी वाण लुटताना विधवेला अश्रू दाटतात ना…असा कधी प्रेमळ तर कधी हळव्या वाटावळणांचा प्रवास..नेत्रदान, रक्तदान, अन्नदान या रूपाने सामाजिक ऋण फेडण्याचे साधन ठरवू या…अशा कृतिशील टप्प्यापर्यंत पोहचताना बघताना खरोखरच शिलेदार दादा-ताईंचे कौतुक वाटले…!*

*जानेवारी महिना आला की, आपल्या भारतीयांना वेध लागतात मकरसंक्रांतीच्या सणाचे आणि गणराज्यदिनाचे. एक धार्मिक तद्वतच भौगोलिक बदलाची महती सांगणारा सण तर दुसरा आपल्या राष्ट्राला एकसंघतेने बांधून ठेवणारा राष्ट्रीय सण. तसं बघितलं तर दोहोंचाही आशय एकच मनामनामध्ये एकजूट निर्माण करणे, प्रेमभावना वाढीस लावणे… आणि आपल्या विषयानुसार ‘गोड बोलून बघू या’ चा आशय सार्थ करणे.*

*सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस म्हणजे मकरसंक्राती होय. भारताच्या वैविध्यतेनुसार वेगवेगळ्या प्रांतात तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो आणि साजरा केला जातो. महाराष्ट्र- आंध्रप्रदेशातील मकरसंक्रांती तामिळनाडू मध्ये पोंगल होते, केरळमध्ये मकर विलक्कू, गुजरातेत उत्तरायण, पंजाब मध्ये लोहडी किंवा माघी, आसाममध्ये माघ बिहू किंवा भोगली बिहू अशा विविध नावांनी साजरा केल्या जाणाऱ्या या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे नव्याने आलेल्या धान्याचे स्वागत करून चराचराला अर्पण करून निसर्गाप्रती ऋण बाळगणे…खरेच विविधतेही एकता जपली जाण्याचा हा सरळसोपा मार्ग…आपले जीवन समृद्ध करत जातो.*

*आरंभी गमती गमती मध्ये काही कवन ओळी लिहिल्या ‘काढू का मी उठाबशा…पकडू का दोन्हीही कान…चुकलेमाकले असेल जरी…क्षमा करुन दूर सारू ताण..खरेच ही संधी सणाच्या निमित्ताने आलेली परिस्थितीनुरूप झालेल्या चुकांना दुरुस्ती करण्याची…मनात असलेल्या कटू अनुभवांना दूर सारण्याची…चला तर मग द्या आता तिळगुळ हातावर आणि बोला गोड आता…. सर्वांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा…!*

➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔖🌸🔖♾️♾️♾️♾️

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles