
‘मानवी उत्पत्तीच्या संदर्भाचं गूढ’; प्रा तारका रूखमोडे
मनू उत्पत्ती
सृष्टी किमया न्यारी
गुढत्व भारी
निसर्गाची सर्वात मोठी चमत्कृती म्हणजे ‘मानव उत्पत्ती..’पृथ्वीवर साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी जीवनाचा उगम झाला असं म्हटलं जातं.. पण तो कसा झाला? कां झाला? मानव उत्पत्तीचे रहस्य अजूनही नं उलगडलेलं कोडंच आहे.. या विराट उत्पत्तीत मनू जन्माची अनेक गूढं लपलेली…व त्याच्याच शोधासाठी मानवाच्या कूळकथेची विविध संदर्भ बाहेर आलेली..
💫पृथ्वीवरील सजीव सृष्टी सर्वव्यापी ईश्वराने निर्माण केली असं अध्यात्मात म्हटलेलं..बायबलात सांगितलं आहे की परमेश्वरांने माती पासून मनुष्य घडवला त्यात प्राणवायू ओतला, सजीव तत्व निर्माण केलं.. तोच सजीव म्हणजे ‘आदम’ ..म्हणजेच पृथ्वीवरील ‘पहिला मनू’..त्याच्याच बरगडीतून ‘ईव्ह’ म्हणजे स्त्रीची निर्मिती झाली.अदन वाटिकेतील ज्ञानवृक्षाची फळे खाल्ल्याने त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. व ईश्वराने वंशवृद्धीसाठी त्यांच्यात जीवनबीज निर्माण केले, त्यातूनच मनूविश्वाची उत्पत्ती झाली असे गृहीतके आहेत.
चेतना शक्ती
ही अद्भुत निर्मिती
दैवी ठिणगी
💫याच मानव उत्पत्तीतील आदमच्या निर्मितीचं एक रहस्य इटालियन कलाकार मायकेल एंजेलो यांच्या भीत्तीचित्रात दडलेलं.. अप्रतिम प्रतिकात्मकतेतून त्याने माणसाच्या प्रकटीकरणाचे चित्र रंगवले आहे.. त्या चित्रात देवाने आपल्या प्रतिरुपानुसार मनुष्य बनवूया या जाणिवेतून ..देवानेच आदमला स्वतःच्या बोटातून जीवनचैतन्य देण्यासाठी पुढे केलेला हात आहे. तो हात आदमच्या हातात देताना त्यातूनच पहिली महान स्पार्क म्हणजेच ‘ठिणगी’ तयार झाली ही ठिणगी म्हणजेच चैतन्य..देव आदमला बुद्धीची देणगी देत आहे.. हाच अर्थ ..हीच ती जीवनाची ठिणगी देवाच्या बोटातून आदमकडे जाताना चित्रात चकाकणारी..किती सुंदर मर्म व आशय अर्थ रेखाटणारी एंजोलोची चित्रकला ..खरंच.. किती गहन अर्थ नि भव्य आशय या प्रतीकात्मक चित्राचा!! .आदरणीय राहुल सरांनी विचारांना चालना देणारं हे अर्थपूर्ण चित्र दिलेलं…मी ही या महान कलाकाराच्या कलेकडे पाहतच राहिले..व मानवी उत्पत्तीच्या संदर्भाचं गूढ उलगडत राहिले..
✍️हे चित्रस्वरूप म्हणजे त्या कलाकाराने रेखाटलेल्या कल्पकतेची किमयाच आहे.अशीच किमया प्रतिकात्मक चित्रातून क्षणं टिपून माझ्याही शिलेदारांनी लेखणीत रेखाटावी म्हणून कदाचित आ.राहुल सरांनी हे चित्र दिलेलं… पण आज जरा मनाला नेहमीसारखं समाधान देणारं रेखाटन रचनेत कमी जाणवलं…तिथे कृत्रिम हात नव्हताच.. तर इ.स 1508 ते 1512 या कालखंडात निर्माण झालेल्या ‘द क्रिएशन ऑफ ॲडम’ या फेस्को पेंटींग मधील मायकेल ऐंजोलोची ती पेटींग आहे..देवाचा स्पर्श आदमला जीवनचैतन्य देताना.. सूक्ष्म निरीक्षण करा.. प्रत्येक चित्रातील बाबींचं आकलन नक्कीच होईल ..कवीमनाला हायकूकाव्यासाठी प्रत्येक सूक्ष्म बाबींसाठी विचार प्रवृत्त झालंच पाहिजे.. सर्वांनी प्रयत्न केलाय.. सर्वांना अभिनंदनीय शुभेच्छा ..
लिहिते होऊ या.. निरीक्षण शक्ती वाढवूया व आदर्श वाचक बनूया.. मकर संक्रांतीच्या सर्वांना तिळगुळापरी गोड गोड शुभेच्छा..💐💐
आदरणीय राहुल सर आपण मला परीक्षण लेखनाची संधी दिलीत आपले हृदयस्त ऋणाभार..🙏🙏
प्रा तारका रुखमोडे गोंदिया
➿➿➿➿☔✒️☔➿➿➿➿