सुधीर तांबे पक्षातून निलंबित, चौकशी होईस्तोवर शांत राहणार

सुधीर तांबे पक्षातून निलंबित, चौकशी होईस्तोवर शांत राहणार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: मतदारसंघातील निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी ऐनवेळी अर्ज दाखल न केल्यामुळे काँग्रेस पक्षाने कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत काही बोलणार नसल्याचे तांबे यांनी भूमिका घेतली आहे.

काँग्रेसने डॉ. तांबे यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने शिस्तभंगांची कारवाई केली आहे. पक्षाने कारवाई केल्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. सुधीर तांबे म्हणाले, ‘ काँग्रेस पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मला काहीही बोलायचं नाही’. तर दुसरीकडे सुधीर तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यावरून तांबे म्हणाले, ‘मी भाजपा मध्ये जाणार चर्चा खरी नाही. आम्ही भाजपाला पाठिंबा मागितला नाही. मी पक्षाविषयी काहीही बोलणार नाही. मला जर पक्ष श्रेष्ठींनी बोलावलं, तर मी भूमिका मांडायला जाईल’.

टीडीएफ या शिक्षक संघटनेच्या पाठिंब्यावर भाष्य करताना तांबे म्हणाले, ‘टीडीएफ शिक्षक संघटनेने मला पहिल्यापासून पाठिंबा दिला. प्रत्येक संघटनेची एक कार्यपद्धती असते, त्यानुसार त्यांचा निर्णय होईल’.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles