राज्यतरीय भव्य कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
वसुधा नाईक, प्रतिनिधी
मुंबई: कांदिवली येथील बालमंदिर समाजकल्याण केंद्र, शिंपोली
सभागृहात महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती यांच्या वतीने राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा आज दि १५ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या थाटात पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे खासदार गोपाल शेट्टी, गझलकार विजय जोशी, रजाक शेख, कवी, आनंद अहिरे, अभिनेत्री रुपाली पवार, गायिका छाया साखरे, प्रा, आशाताई ब्राम्हणे, सोमनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना साहित्यगौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बोरवलीचे खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले. यावेळी सोहम पब्लिकेशनचे प्रकाशक व साहित्य सेवा दैनिकाचे संपादक
कवी, नितीन गायके उपस्तिथ होते.