
पाऊल प्रगतीचे
क्षितिजा पार आस अधीर
एकेक उकल करताना
नवनिर्मितीचा ध्यास उरी
पाऊल प्रगतीचे एकेक रांगताना
जुन्या नव्याची मैफिल हळवी ज्ञानरांजण भरता भरताना अध्यापनाची रीतही न्यारी
पाऊल प्रगतीचे एक एक धावताना
विविध धोरणांची रेलचेल नवीन नव्याने कक्ष निर्मिती करताना गुणवत्तेची कासही प्यारी
पाऊल प्रगतीचे एक एक वाढताना
विषय समृद्धी होते निपुण नियोजनबद्ध संकल्प रुजताना
वक्तशिरपणे होती कार्य सारी
पाऊल प्रगतीचे एक एक प्रसारताना
उपक्रमासह संस्कृतीची उधळण नवतंत्रज्ञानाचे आतिथ्य करताना एकजुटीने करतो शिक्षणसमृद्धीची वारी
पाऊल प्रगतीचे एकेक जिंकताना
ऊर्मी (हेमश्री) घरत, पालघर
=======