
वाटते तसे नाही
सारेच अवघड होऊन बसले
वाटते तसे नाही, सोपे काही
रूढी अन परंपरेचा पगडा
मनावरचा काही उतरत नाही.
शिक्षणाने साक्षर झालो मात्र
आचरणात शिक्षण राहून गेले,
ज्ञानाणे समृद्ध झालो केवळ
आयुष्य मात्र कोरडेच राहून गेले.
जोती सावित्रीनीं शिक्षण खुले केले
माऊलपणा घेतला, सर्वमानव जातीचा,
अर्थ,शिक्षणाचा कळला फक्त स्वतः पूरता
आतातरी,जागृतपणे प्रसार करू त्यांच्या कार्याचा.
डोळस जरी आंधळे आम्ही
नेहमीच वाटा चुकतात अश्या,
हमरस्ता सोडून फसगत होते
म्हणून,करू नये आपल्या जगण्याचा तमाशा.
मायादेवी गायकवाड
(मानवत )परभणी,