
माझा सखा
तुझ्या रूपाने लाभले
मला माझेच सर्वस्व
तुझ्या हृदयात दिसले
मला माझेच अस्तित्व
वडीलांप्रमाणे धाक
अनावर होतो जेव्हा राग
नंबर करतो माझा ब्लॉक
येई मला खळखळून जाग
मायेची वात्सल्य मूर्तीं
गाजावी जगी तुझीच किर्ती
प्रेमाने मला जवळ करती
उपाशीपोटी घास भरवती
भावासारखा पाठराखण
गर्दीत करतो माझे रक्षण
जाणीव मजला सुरक्षीतेची
काळजी माझ्या प्रत्येक क्षणाची
बहीणी समान धावून येतो
दुःखात कवटाळूनी घेतो
जगाची रितं समजून सांगतो
गाली हास्य फुलवून आणतो
मैत्रीत एक पाऊल पुढेच
मदतीचा हात निरागसपणे
सखा सोबती रूपाने
लाभला मला नशिबाने
तुझ्या रूपातील तेजाने
कोहिनूर हिरा ही लाजते
गोडवा तुझा गाण्यासाठी
आकाशगंगा ही नाचते
राहो अशीच तुझी साथ
मऊ मखमली तुझा हात
शेवटचा श्वास तुझ्या कुशीत
सौभाग्य खुलले तुझ्या रूपात
सारिका डी गेडाम, चंद्रपूर
===