मी का अजून ओले ?
मला माझेच डोळे पुसती
मी का अजून ओले …?
मिटलेले ओठ माझे
हृदयात शब्द बोले
मला माझेच डोळे पुसती
मी का अजून ओले…?
खळाळून हसणे माझे
त्यांना न भावले
मला माझेच डोळे पुसती
मी का अजून ओले…?
धरली कास परीश्रमाची
डोळ्यात स्वप्न लेले
मला माझेच डोळे पुसती
मी का अजून ओले….?
कधी थरथरल्या पापण्या
कधी अबोल झाले
मला माझेच डोळे पुसती
मी का अजून ओले…?
स्मरून जाळे वेदनांचे
डोळे भरून आले
मला माझेच डोळे पुसती
मी का अजून ओले…?
सीमा प्रशांत वैद्य
वरोरा,जि. चंद्रपूर
=====