बदली
कधी कधी मनामध्ये
भरते अनामिक भीती
कळेना कशी हाताळावी
बदलीची वज्र परिस्थिती
प्रवास हा नोकरीतील
वाटतो मलाही खडतर
या अनोळखी वाटेवर
होईल ना जगणे सुखकर?
विचाराची ती अस्थिरता
चढवी निराशेचा डोंगर
यादीतील गावांचा क्रम
कसा जमवावा बरोबर
कळतच नाही मजला
करावे तरी नेमके काय
झरी मारेगाव की वणी
याचाच थांगपत्ता न्हाय
शेवटी ठरवले एकदाचे
जसा जमेल तसा प्रवास
प्रसंगाशी जुळवून घेण्याचा
हर घडी करावा प्रयास
माधुरी काळे
वणी जिल्हा यवतमाळ