
प्रेमाची पावती
आज स्वप्नात पहाटे
सख्या तुलाच पाहीले
कशी सांगू पाहताच
भान माझे हरपले
गालावर आली माझ्या
तुझ्या प्रेमाचीच लाली
तुझ्या जादुई स्पर्शाने
काया माझी मोहरली
झुकलेल्या नयनांना
ध्यास तुला बघण्याचा
भाव तो नजरेतला
ठाव घेतसे ह्रदयाचा
शब्द जणू हरवले
झाली स्पंदने बोलकी
ह्रदय माझे चोरुन रे
जाऊ नकोस दूर की
स्वप्नातल्या जगात या
बहरुन आली प्रिती
अधरास स्पर्शुनी तू
दिली प्रेमाची पावती
आली जाग अचानक
येता झूळक हवेची
लाजणाऱ्या मुखावर
चढे लालिमा प्रितीची
अर्चना सरोदे
सिलवास,दादरा नगर हवेली आणि दमण व दिव