मतदार राजा

मतदार राजा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मतदार राजा कधी रे कळेल ?
धर्मांधता डोक्यातून रे पळेल ? !!धृ!!

जातीधर्मात अडकवून रे तुला
उखळ पाढरं करून रे ते घेतात
हाडाची कांड करूनही कष्टकरी
चटणीसंग खातात कशी भाकरी ?

लोकशाहीचा अर्थ कधी रे कळेल ?
मानवनिर्मित संकट कसे रे टळेल ?
तापल्या तव्यावर भाजतात पोळी
स्वप्नांची तुझ्याच रे पेटवतात होळी

मतदार राजा गोंडस रे ती आश्वासनं
निवडून तूच देतो किती विश्वासानं ?
रानमळा फुलवितो शिंपून तूच घाम
कष्टाला तुझ्या योग्य मिळेना का दाम ?

डोळं झाकून बटन कसा तू दाबतो ?
पोटात अन्न नसताना का रे तू राबतो ?
इडा पिडा टळो नि बळीचं राज्य येवो
कूटनीती संपून ही पोशिंदा सुखी होवो

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles