वंशावळ
आभासी दुनियेत या
वीण नात्यांची तुटली
स्वार्थापुरतीच नाती
फक्त आता उरली
कुटुंबे झाली विभक्त
स्वातंत्र्य म्हणती हवे
कशास हवेत आता
जुने ते जाणते दुवे?
इथेच सारे चुकले
संस्कार गेले लयाला
एकत्र कुटुंब आता
हवेच ते जपायला
वंशावळ जपण्याचा
प्रयत्न नित्यची हवा
छत्रछायेत स्नेहाच्या
हर्षदीप उजळावा
वडिलधारे सांगती
ते बोलची अमृताचे
संस्कारांची जपणूक
येतील दिन सौख्याचे
वृक्षची पिढ्यापिढ्यांचा
असा बहरूनी यावा
अभिमाने इतिहास
स्वकर्तृत्वाने निर्मावा
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली,जिल्हा सांगली
=======