तू ओढ सागराची
असतील कैक सरीता त्या विशाल सागरा
गोड्या पाण्याचा सोस त्या खाऱ्या पाण्या
आस त्याच्या मना ,सरीता तुझ्या प्रेमाची
तू आदळशी आपटशी हालत खराब सागराची
एक ना अनेक तयां परि जीव सर्वांवर त्याचा
स्पर्श जणू रोजचा असे सागरास परिचयाचा
तू ठरवले कितीही परि तुझा तोच किनारा
येशी फिरून चौफेर मिळशी तू सागरा
तो ही विशाल ह्रदयी रीती सामावून घेण्याची
नकोस समजू एकटी ,तू ओढ सागराची
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड