प्रलोभन
उदंड झाली समाज माध्यमे
वापरकर्त्यानो वेळीच व्हा दक्ष
प्रलोभनाची शिकार होऊनी
व्हाल आंतरजाल जगी भक्ष्य //
मोफत सुविधांचे प्रलोभन करी
ग्राहकांना सदोदित आकर्षित
नाव,पत्ता,बॅंक तपशील घेऊन
फसवणूकीचे साधतील इप्सित //
सुरक्षेचे तंत्रज्ञान वापरून
संभाव्य धोका वेळीच टाळावा
समाजमाध्यमांचा वापर करताना
सुरक्षितता,सतर्कतेचा नेम पाळावा //
प्रलोभन ही वाट असे धोक्याची
बळी त्याला कदापिही पडू नका
फसवणूक ही ठरलेली त्यामुळे
प्रलोभन,आमिषाला थारा देऊ नका…..
प्रलोभन आमिषाला थारा देऊ नका…..//
दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
उस्मानाबाद