
तिच्या संघर्षातली ती
आयुष्यभर स्वतःशीच संघर्ष
करत राहिली ती
जगून मरायच की मरून जगायचं,
ह्या वादळात छळत राहिली ती
रोजचा संघर्ष मनाशी,भावनांशी,
तरी का नेहमी हसत राहिली ती
कणाकणाने जगताना अस्तित्व,
सारखीच मरत राहिली ती
तू कमजोर आहेस, तू स्त्री ची जात
हे ऐकूनच स्वतःला सिद्ध करत रहिली ती
स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी,
कोमेजून सुद्धा फुलत राहिली ती
नाही जमलं तिला भावनांच प्रदर्शन करायला,
तरी सुद्धा का सगळ्यांपासून अलिप्त राहिली ती
शब्दांतून व्यक्त नाही झाली तरीही
तिच्याच ओळीत निशब्द राहिली ती
तिच्याच ओळीत निशब्द राहिली ती.
सविता वामन ठाणे.