
वंशावळ
सुखाचा जुना काळ
पूर्वज होतेच प्रेमळ
आनंदी असे सकाळ
स्वभाव होते निर्मळ!
जर शोधली वंशावळ
समजला सर्वच खेळ
खरचं लोक हे दुर्मिळ
दूरदृष्टी जपला काळ !
कुणी जपली वंशावळ
अनोखी ही संध्याकाळ
जशी भासे कातरवेळ
स्वभाव किती हे सरळ!
एकमेकांना देई रे वेळ
शुभ चिंतन असे प्रेमळ
टिकले असे फार काळ
वाचावी कधी वंशावळ!
पंजी पंजोबा नावे सरळ
करी प्रार्थना गोड सकाळ
अंगी होते हत्तीचे हे बळ
लिहावी पुढेही वंशावळ!
इतिहास साक्षीला सबळ
अर्थपूर्ण आहेच वंशावळ
भविष्यात हवी चळवळ
यशस्वी व्हावी वंशावळ!
अशोक महादेव मोहिते
बार्शी जिल्हा सोलापूर
======