तू ओढ सागराची
तू ओढ सागराची
असे माझ्या मनाची
लाटांची भेट होई
फक्त एका क्षणाची||१||
कसा सांगू सागरा
माझ्या मनाचा ठाव
वाळूवरी रेखाटी
अबोल शब्द भाव||२||
सुंदर जीवनात
लागे प्रेमाची आस
एकटा चालताना
होतो तुझाच भास||३||
सागर किनारी मी
वाट तुझी पाहतो
तुझ्या आठवणीत
सदोदित रमतो||४||
तू ओढ सागराची
मी मासा हा प्रेमाचा
अडकण्या जाळ्यात
अविचार क्षणाचा||५||
विनायक कृष्णराव पाटील, बेळगाव
=======