
वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट तर्फे एक दिवसीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन ३ फेब्रुवारीला
नागपूर: शहरात आणि विदर्भातील अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे आयुष्य सुदर व उज्वल करण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक रोजगार उद्योगाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता हा एक दिवसीय उपक्रमाचे आयोजन केले आहे.
3 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी ९ वाजता पासून डोंगरगावच्या परिसरामध्ये भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामध्ये नामांकित 51 कंपन्या महाविद्यालयातील परिसरामध्ये प्रत्यक्षात येऊन सहभागी होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत.
तेव्हा बी.ई.एम.टेक. पॉलीटेक्निक, आयटीआय 12 वी पास, तसेच इतर पदवी प्राप्त विद्यार्थी, या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात या भव्य महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता प्रवेश निशुल्क असून दिलेल्या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक राहील.
https://tinyurl.com/52a6c48a
या लिंक वर संपर्क साधू शकता.
रोजगार मेळाव्या करिता साउथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशन पासून वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर पर्यंत बसची सुविधा सकाळी ९ वाजता पासून दर एक तासानंतर उपलब्ध राहील असे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट डोंगरगाव नागपूर च्यावतीने पत्रपरिषद घेण्यात आली असून त्यावेळी डायरेक्टर डॉ.भरत चेडे, वैनगंगा बहुद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष तसेच चेअरमन डॉ. ब्रह्मानंद करंजेकर आणि ॲडव्हायझर डॉ.प्रदीप दहीकर यांची मंचावरील उपस्थिती होती.