
‘मोदी -मोदी’च्या घोषणात सीतारमण यांनी केला अर्थसंकल्प सादर
नवी दिल्ली : आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अनेक विविध घोषणा निर्मला सीतारमण यांच्याकडून केल्या जात असताना सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना संसदेत पाहण्यास मिळाला. काही लोकप्रिय घोषणा केली की सत्ताधारी बाकं वाजवून ‘मोदी-मोदी’च्या घोषणा करत होते. या घोषणांना विरोधकांनी प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
अर्थसंकल्पाच्या सुरूवातीलाच या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकवेळी जेव्हा सत्ताधाऱ्यांनी ‘मोदी मोदी’ घोषणा दिल्या त्यावेळी त्यांना विरोधक ‘भारत जोडो, भारत जोडो’ या घोषणांनी उत्तर देत आहेत हे पाहण्यास मिळत आहे.
संसदेत सलग पाचव्यांदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे अमृत काळातलं बजेट आहे असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. अशात त्यांनी अर्थसंकल्पातल्या तरतुदी सांगितल्यानंतर ‘मोदी मोदी’ घोषणा केल्या. त्या घोषणांना विरोधकांनी ‘भारत जोडो, भारत जोडो’ घोषणांनी उत्तर दिल्याचे पाहायला मिळालं आहे.