
गुणेश्वर आरीकर : एक समाजसेवक
समाज परिवर्तन आधुनिक काळाची गरज आहे. महाराष्ट्रात १३ व्या शतकात संतांचा जन्म झाला; आणि महाराष्ट्राला एक नवी दिशा मिळाली. म्हणूनच तेराव्या शतकाला महाराष्ट्राची देणगी म्हणतात.अशाच देणगी स्वरूपातला एक मौल्यवान रत्न , अनमोल हिरा खैरे कुणबी समाजात ‘नेरला’ या छोट्याशा गावी आई प्रभावती व पिता पुरुषोत्तम या गरीब दाम्पत्याच्या पोटी १९जुलै १९७३ ला जन्माला आला. पुढे हा हिरा गुणेश्वर आरीकर या नावाने समाजात हळूहळू चमकू लागला व इतरांना प्रकाशित करू लागला. या समाजभूषणाचे करावे तितके कौतुक कमी असणार अमृताचे बोल अपुरे पडणार. खरं सांगायचं म्हणजे नावाप्रमाणे कतृत्व कीर्ती आहे. समाज कार्याची आवड समाजप्रेरक होऊन आपली कर्तव्य पार पाडणे सुरू केले. आपण सर्वांना एकच माहीत आहे राजकीय लोक आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडतात ; परंतु समाजाचे परिवर्तन घडवण्याचे कार्य मात्र गुणेश्वर आरीकर सारखेच समाज प्रवर्तक समाज परिवर्तन करतात. खैरे कुणबींचा जर विषय घेतला तर यांनी या समाजाला भुरळ पाडणारे कार्य सुरू केले. म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचा, कर्तृत्वाचा व त्यांच्या अभंगाचे व्यासंगी वाचन करून जनसामान्यांना आपूलकी जिव्हाळ्याचे स्नेहबंध निर्माण करणे शिकविले. असा फार मोठा परिणाम यांच्या वर झाला. त्याच वाचनातून महाराजांच्या मार्गावर चालून अनेक गरिबांना गरजूंना आपलं समजून त्यांना वेळोवेळी मदत करण्याचा प्रण धरला.
ही भूमिका स्पष्ट केली. संत तुकाराम महाराज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या तालुका जिल्हा नागपूरचे अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघचे कोषाध्यक्ष, खैरे कुणबी बहुउद्देशीय संस्थेचे मुख्य संयोजक व संत जीवनदास महाराज धर्मदाय संस्था मार्कंडादेव त. चामोर्शी जिल्हा गडचिरोलीचे सचीव व रिफ्रेश मुक्ती केंद्राचे मार्गदर्शक आणि मे. व्यंकटेश बिल्डर्स अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्सचे मुख्य संचालक श्री गणेश्वरराव पुरुषोत्तमजी आरीकर यांना येत्या १९ जुलैला ५० वर्षे पूर्ण होत आहे. तर या पन्नास वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक संस्थेशी जोडून संस्थेचे पद सांभाळून संस्था कशा टिकवायच्या व संस्थेद्वारे समाजाचे समाज परिवर्तन करून समाजकल्याण कसे करता येईल यावर सतत ते सखोल संशोधन करत असून समाज सेवकाची भूमिका घेऊन आपल्या कुटुंबासोबत समाज बांधवांचाही तन- मन-धनांनी उद्धार करीत आहे.
माणसाला माणूस समजणे ही फार मोठी कला आहे. खरंतर गुणेश्वरराव हे समाजासाठी एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. आलेल्या पाहुण्यांचा आपण मान करतो पाहुणेर करतो पाहुणचार करतो. परंतु कुणाशी रक्ताचं नातं नसतानाही एक माणुसकीचं नातं जपणारा मोठ्या मनाचा मोठा व्यक्ती. उदरनिर्वाहाच्या घरात कुटुंबात येणाऱ्या गरजू व गरीब व्यक्तीला विश्रांती व निवारा प्राप्त व्हावा. व तोही विनामूल्य असं समाधानाचं महानकार्य मात्र या महान समाजसेवकांनी आपल्या घरापासून सुरुवात केली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या वरील ओळी मनुष्याला त्याना खरा धर्म शिकवतो असं म्हणतात परंतु कित्येक लोकांनी हा धर्म बुडवलेला आहे. म्हणूनच आपल्या समाजाला या देशाला श्री गुणेश्वररावजी आरीकर अशा अनेक विविध पुरस्कारानी सन्मानित होऊन समाजरत्न स्वीकारणारे समाज स्नेही समाजप्रेरकाची समाजसेवकाची अत्यंत गरज आहे. समाजाला आपलं कुटुंब समजणारा त्याला जवळ घेऊन सर्वस्वी समजणारा स्मीत बोलणारा मराठी भाषेची अस्मिता जपणारा मराठी माणूस म्हणजेच श्री गुणेश्वर पुरूषोत्तमजी आरीकर: एक समाजसेवक
ब्रम्हानंद गणपत मुळे
बुटीबोरी ता.जि. नागपूर