
दीक्षाभूमी स्मारक समितीवर डॉ. राजेंद्र गवई सचिवपदी
नागपूर: आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या दि.१९ जुलै २३ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत डॉ. राजेन्द्र गवई यांची सचिवपदी बहुमताने निवड झाली. समितीचे माजी सचिव डॉ.सुधीर फुलझेले यांनी त्यांच्या प्रकृतिच्या कारणामुळे सचिव पदाचा राजीनामा दिला होता. त्यावर आजच्या सभेमध्ये सविस्तर चर्चा होउन डॉ.सुधीर फुलझेले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. सचिव पदासाठी डॉ.राजेन्द्र गवई यांचे नाव डॉ.प्रदीप आगलावे यांनी सुचविले. त्यांना विलासराव गजघाटे यांनी अनुमोदन दिले.
आजच्या सभेत उपस्थित समितीचे अध्यक्ष, भदन्त आर्य नागार्जून सुरई ससाई, डॉ. कमलताई रा.गवई, एन.आर. सुटे, प्राचार्य डी.जी.दाभाडे, अँड.आनंद फुलझेले, डॉ.प्रदिप आगलावे, डॉ.चंद्रशेखर मेश्राम, विलास गजघाटे, भन्ते नागदिपंकर या सर्वांनी डॉ. राजेन्द्र गवई यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.