बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*प्रेमकिनारा*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आदीत्य वसुंधरेचा प्रेमकिनारा
क्षितिज सुंदर गोलाकार
सुवर्णकिरणे कंठावर विराजमान
सौभाग्यवती ल्याली जसे कनकालंकार

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेम किनारा*

जीवनी असावा प्रेम किनारा,
सुखदुःखाच्या परीक्षेत निवारा,
नकोत फक्त वरवरचा पसारा,
सदैव असावा कुटुंबाचा सहारा||

*सौ. उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*प्रेमकिनारा*

तुझ्या नि माझ्या प्रीतीचा
वाहू लागला निखळ वारा
समजून एकमेकांना
गाठू आपण प्रेमकिनारा.

*श्री अजय रामटेके, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*

आनंद मनामध्ये
वेचला मी सारा
दुख सारे सारले मी
मीळाला प्रेमकिनारा

*गोधणे प्रकाश पुंडलिक*
बाचोटीकर ता.कंधार
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*

सजवू अपुला प्रेमकिनारा
तुझ्या नि माझ्या प्रेमाचा
उमटवू ओल्या वाळूत या
सोहळा आपल्या मिलनाचा

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*

*माझ्या जीवनाच्या तारूला*
*प्रेमकिनारा लाभू दे*॥
*भरकटलेल्या मम जीवनाला*
*सखे!तव आसरा मिळू दे*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*

तुझी लाभता सोबत
मिळाला प्रेमकिनारा
दुनियेत या प्रेमाच्या
होता तुझाच सहारा

*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*

सैरभैर जिवन माझे
तुझ्यामुळे स्थिर झाले
या तटाहून पैलतिरी
प्रेमकिनारी तूच नेले

*✍️बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*

तुझ्या प्रेमाच्या सागरात
निखळ वाहू दे झरा
प्रितीच्या झुल्यामध्ये
बांधू दोघे प्रेमकिनारा…

*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🩷💚🩷➿➿➿➿
*प्रेमकिनारा*

जीवनात करावे प्रेम
प्रेमाला मिळावा सहारा
प्रेमाला फुलविण्या साठी
हवा एक सुंदरशा प्रेम किनारा

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles