माय माझी मायेचा झरा

माय माझी मायेचा झरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

माय माझी मायेचा झरा
तिने दिले सर्व गोष्टींचे बाळकडू
विरोधात गेला वर्तमान सारा
तरी येणार नाही अगतिकतेने रडू …१…

सर्वस्थितीत कुटुंबवत्सल
नाही ठेवत ती कर्तव्यामध्ये कसर
हातात पाककला चपखल
पुढ्यात ठेवते रुचकर अन्न तत्पर …२…

सकाळपासून सुरु लगबग
सर्वांच्या आवडीनिवडी सांभाळते
जीवाची जरी झाली तगमग
तरी चेहऱ्यावरती स्मितहास्य ठेवते …३…

जरा आम्हाला झालाच त्रास
मायेने फिरविते डोक्यावरून हात
वाढतो लोप पावलेला उल्हास
करतो मग लिलया संकटावर मात …४…

तिच्या कोर्टात सर्वकाही माफ
त्यातून क्षमाशीलतेची देते शिकवण
देवासारखे मन असते तिचे साफ
कसे फेडावेत कळत नाही तिचे ऋण …५…

नितीन झुंबरलाल खंडागळे
अंबरनाथ जि ठाणे

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles