
पालखी
वाजत गाजत येई आषाढ
रिमझिम पावसात सुंदर आभाळ
देव पालखी गजरात दुमदुमली
वारकरी तालात टाळ्या वाजवी
ज्ञानोबा-तुकोबा माऊली जयघोष
जयहरी विठ्ठल-रखुमाई नामघोष
भजनांचा लय अभंग गात
टाळ-मृदंग अखंड निनादत
भाविक उत्साही स्वागता सीमेवर
पालखीची महापूजा गावोगाव-शहर
अंबरी उधळती बुक्का गुलाल
घोडाहत्ती रिंंगण पहाया बालगोपाल
दिंडी जल्लोषात मार्गस्थ होई
संतमेळा आतुर पंढरपुरा येई
सुनीता पाटील
जिल्हा अहमदनगर