कसबे सुकेणेच्या जाधव वस्तीवर बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणेच्या जाधव वस्तीवर बिबट्या जेरबंद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नाशिक: निफाड तालुक्यातील कसबे सुकेना येथील गावशिवार जवळच असलेल्या शरद जाधव यांच्या वस्तीवर बिबट्या जेरबंद झाला आहे.

कसबे सुकेने, साकोरेमिग, कोकणगाव, वडाळी या शिवारात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा संचार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे होते, सदरच्या बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांना लक्ष केले होते,शेतमजुरांना हि शेतात काम करतांना सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बिबट्यामुळे परिसरात शेतात काम करण्यासाठी मजूर हि शेतकऱ्यांना मिळेनासा झाला होता. लहान मुले ही शाळेत जाण्यासाठी किंवा घराबाहेर खेळण्यास घाबरत होते.

निफाड वनविभागाने बिबट्याच्या मागावर कसबे सुकेने शिवारात सुकेने- कोकणगाव रस्त्यालगत असलेल्या शरद जाधव यांच्या वस्तीवर पिंजरा लावला होता, याच पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी व शेत मजुरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे, सदरच्या बिबट्याला विशेष वाहनाने निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये ठेवण्यात आले असून त्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती निफाड वनविभागाने दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles