दुसरी अंकूर सीड्स कॅरम स्पर्धा ५, ६ ऑगस्टला

दुसरी अंकूर सीड्स कॅरम स्पर्धा ५, ६ ऑगस्टला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: प्रेस क्लब आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील माध्यम कर्मचाऱ्यांसाठी दुसरी अंकुर सीड्स कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ५ आणि ६ ऑगस्ट २०२३ रोजी सिव्हिल लाईन्स येथील नागपूर प्रेस क्लबच्या वातानुकूलित सभागृहात होणार आहे. एकेरी आणि दुहेरी गटात आयोजित या स्पर्धेत प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच पोर्टल्समध्ये काम करणाऱ्या सदस्यांना भाग घेता येईल.
स्पर्धेचे उद्घाटन ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर, सचिव परितोष प्रामाणिक तसेच स्पर्धेचे संयोजक चारुदत्त कहू यावेळी उपस्थित राहणार आहेत. ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

रोख पारितोषिके

एकेरी आणि दुहेरी कॅरम स्पर्धेतील विजेते, उपविजेते यांना आकर्षक रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्हे दिली जातील. एकेरी स्पर्धेतील विजेत्यांना ७,००० रुपये, उपविजेत्याला ५,००० रुपये तर तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला ३,००० रुपयांचे रोख पारितोषिक मिळेल. दहेरी गटातील विजेत्यांना १०,००० रुपये, उपविजेत्याला ७,००० रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ५,००० रुपये मिळतील.

प्रवेश शुल्क आणि अर्ज

प्रवेश शुल्क एकेरीसाठी १०० रुपये आणि दुहेरीसाठी २०० रुपये आहे. प्रवेश अर्ज नागपूर प्रेस क्लब, टिळक पत्रकार भवन आणि संबंधित वृत्तपत्रांच्या स्पोर्ट्स डेस्कवर उपलब्ध राहतील. प्रवेशिका राजेश साखरकर यांच्याकडे प्रेस क्लब किंवा देवराव प्रधान यांच्याकडे टिळक पत्रकार भवन येथे जमा करता येतील. प्रवेशाची अंतिम तारीख १ ऑगस्ट २०२३ आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,877FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles