उसनवारी

उसनवारी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नाही केली कधी फितुरी
ना केली कधी गद्दारी
ताठ मानेने तो जगला
नाही कुणाची उसनवारी

कष्ट अपार सोसले
केला सोन्याचा संसार
लेकरांच्या कल्याणासाठी
झिजविला देह वारंवार

पतिव्रता पत्नी होती
सुखदुःखाची सोबती
इच्छाअपेक्षांची तिच्या
केली आनंदाने पूर्ती

मायबाप पुण्यवान
श्रावणबाळ तो झाला
अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या
सेवेसाठी तो खपला

अन्नदात्री धरणीमाय
मशागती तो झुंजला
फुलवण्या नंदनवन
माती रंगी तो रंगला

स्वभाव निर्मळ प्रेमळ
सद्गुणांची जणू खाण
नव्हती प्रपंच सुखाला
कधी कुठली ती वाण

आयुष्यभराची कमाई
स्वत्व जपण्याची खरी
नाही करावी लागली
तसूभरही उसनवारी

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.कर्जत जि.रायगड
=========

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles