स्वागत नव वर्षाचे
अपेक्षा आणि संकल्प घेवूनी
नव वर्षाचे स्वागत करूनी
संकल्पाची नवी दिशा ठरवूया
नव ध्येयपूर्तीचे प्रयत्न करुया
नव पुस्तकात बदले पान नवे
नव चैतन्याची अक्षरे मात्र हवे
दुःखाचे कमी करु निखारे
अन स्वप्नांची सर करु शिखरे
सुगंध फुलांचा असावा नात्यात
द्वेष कुणाचा नसावा मनात
सरत्या वर्षातील आठवनी
प्रेमाची नवी मानसे जुळवूनी
जुन्या आठवनी सोबत असती
वर्षाला फक्त कॅलेंडर बदलती
सरत्या वर्षाला निरोप देऊया
नवीन वर्षात प्रवेश करूया
सचिन दळवी
निमगांव, ता.नांदुरा जि.बुलढाणा
=======