वंशाचा दिवा
वंशाचा दिवा मुलगा का बरं
मुलगी का नाही सांगा खरं?
बदलला समाज बदला विचार
नाही तर भविष्यात रे अंधार?
मुला मुलींचा एक अधिकार
मग दोघात फरक काय बरं?
रितीरिवाज अन हे संस्कार
सांगा कुणाच्या जीवावर ?
न्याय व्यवस्था जिवंत जर
मग अन्याय का लेकीवर?
जग पोहचलंय रे चंद्रावर
काय शोधतोस जमिनीवर?
पोती पुराण आहेत आधार
विधवानांनी बनविले उपचार?
व्यथा दोन मनांची खरोखर
योग्य असेल कोणते उत्तर?
वंशाचा दिवा खरा कोण बरं
मुलगा निघाला दिवाळखोर?
आई अन बाप हे घराबाहेर
वृद्ध आश्रमाचे बंद द्वार ?
मुलगी शिकली उत्तम संसार
आई बापाची सेवा थोडीतर?
मुलगा मुलगी दोघे बरोबर
समाज हिनवितो वारंवार?
मोह मायाजाल हे छुमंतर
भरोसा ठेव वेड्या स्वतःवर?
बदला गांजलेले जुने विचार
वंशाचा दिवा मुलगी जरूर!
जर एकच मुलगी असल्यावर
सर्वस्वी तिचाच रे अधिकार?
दोघेही आपला अंश जरूर
मग दोघात का उभे अंतर?
वंशाचा दिवा हवा एकतर
जो घेई जबाबदारी बरोबर!!
अशोक महादेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
=====