रमा
काय सांगू माय तुले
माई रमाची कहानी
भुकेजली पोरं पाहुन
येई डोळा डोळा पाणी
एक एक भाकर माय
कोर कोर वाटून खाय
कन्या कन्या दिसी तर
माय उपाशीपोटी राय
लंकेची पार्वती रमा
गोवऱ्या इकत फिरे
साहेबाच्या काळजीपोटी
मनातल्या मनात झुरे
नको बंगला नको गाडी
साहेब सुखात राहो
व्रतामागून व्रत करीन
सुख डोळाभर पाहो
हलाखीने खंगून रमा
हाडाचा सापळा झाली
अठराविश्वे दारिद्रायात
नव्हता कुणी वाली
सविता धमगाये, नागपूर