वसुधा नाईक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

वसुधा नाईक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे : शहरातील सुप्रसिध्द साहित्यिक , सामाजिक कार्यकर्त्या आणि वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षा सौ. वसुधा नाईक यांना नुकताच तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेतर्फे ‘ डहाळी गौरव 2024 ‘ आणि युनिव्हर्सल युथ संस्थेतर्फे ‘युनिव्हर्सल युथ ॲवाॅर्ड 2024 ‘ प्रदान करण्यात आला.

सदर पुरस्कार विश्वविख्यात साहित्यिक, आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. महिलांच्या सबलीकरणामुळे माऊलींची विश्वकल्याणाची संकल्पना साकारण्यात वसुधा नाईक यांच्यासारख्या कर्तबगार महिलांचे योगदान गौरवास्पद असते, असे प्रतिपादन याप्रसंगी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.

भारतीय अध्यात्माच्या संस्कारांमुळेच
मी समाजकार्यासाठी सक्रियतेने चार पावलं पुढे टाकू शकते असे वसुधा नाईक यांनी पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले. वसुधा नाईक यांच्या नेत्रदिपक यशाबद्दल तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक, अध्यक्षा प्रिया दामले आणि वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्षा सारिका सासवडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles