विविध पुरस्कारांनी सन्मानित आदर्श शिक्षक गणेश पाटील यांच्या ‘स्नेहवलय’ काव्यसंग्रहाचे लोकार्पण

विविध पुरस्कारांनी सन्मानित आदर्श शिक्षक गणेश पाटील यांच्या ‘स्नेहवलय’ काव्यसंग्रहाचे लोकार्पण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नंदुरबार/ शहादा: येथील वल्लभ विद्यामंदीर पाडळदा येथील शिक्षक गणेश नरोत्तम पाटील (म्हसावदकर) यांना राज्यस्तरीय विविध क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल नूतन विद्याप्रसारक मंडळाच्या संचालक मंडळा मार्फत सत्कार सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मा चेअरमन दत्तात्रय सोमजी पाटील होते. प्रमुख उपस्थितीत व्हा चेअरमन विजय लिमजी पाटील,ज्येष्ठ संचालक रमेशभाईजी चौधरी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विजय रतिलाल पाटील यांनी केले. प्रास्ताविकात गणेश पाटील याचे शालेय कामकाजातील विशेषता तसेच उपक्रमशिलता व लेखन कौशल्यावर मुख्याध्यापकांनी थोडक्यात प्रकाशझोत टाकला. गणेश पाटील यांना स्पर्धा परीक्षा, सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेतर्फे मा चेअरमन दत्तात्रय पाटील व व्हा चेअरमन विजय लिमजी पाटील ज्येष्ठ संचालक रमेश भाईजी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच शाळेतील सर्व शिक्षकांतर्फे मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांनी ही गणेश पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भूगोल प्रज्ञाशोध केंदॄ मुंबई द्वारे राज्य स्तरीय उपक्रमशिल भूगोल शिक्षक पुरस्कारचे सन्माचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच शैक्षणिक कार्याबद्दल मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि साहित्य क्षेत्रातील लेखन कविता संग्रह ‘स्नेहवलय’ यासाठी राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार सत्कार सन्मान करण्यात आला .

यावेळी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांंचेही सुवर्ण रौप्य , कास्य पदक व प्रमाणपत्र देऊन अनुक्रमे पूर्वा वाघ, हिना पाटील, किर्ती चौधरी यांचे कौतुक करण्यात आले. पुढील विद्यार्थ्यांना पेन्सिली व प्रमाणपत्र मा.संचालकांमार्फत प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून पुरस्कार प्राप्त गणेश पाटील यांनी ५ वी ते १० च्या सर्व वर्गांसाठी डिजीटल शैक्षणिक साहित्य शाळेस सप्रेम भेट दिलीत. गणेश पाटील स्वलिखीत काव्यसंग्रह ‘स्नेहवलय’ लोकार्पण व सप्रेम भेट याचाही कार्यक्रम संपन्न झाला.

माजी मुख्याध्यापक संचालक अशोक पाटील तसेच संचालक रतिलाल पाटील यांनी आपले मनोगत मांडले. ज्येष्ठ संचालक रमेशभाईजी यांच्या मार्गदर्शनपर संबोधनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर पाटील यांनी केले. कार्यक्रमास संचालक नरोत्तम पाटील, डॉ किशोर पाटील, जगदीश पाटील, यशवंत पाटील, सुभाष पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तरवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles