स्वप्न विकतो आम्ही; सिंधू बनसोडे

स्वप्न विकतो आम्ही



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पायदळी स्वप्नं माझी
ना संसार ना लेकरं…
नियतीचा घाला माझ्यावर
फिरते आता घर घर…

तशी मी अडल्या नडल्या कामाची
फक्त सेवेच्या धर्माची….
हक्क माझे हिरावून घेवून
कामं बांधलेल्या जनावरांची..

गजरा का माळावा म्हणे
नटणे मिरवणे चुकीचे….
सजता धजता हसताच म्हणे
हे बघा चाळे हिच्या जगण्याचे

निसर्ग नियम माझ्या मनाचे
ओरबडून घेती हे जग….
विधवापणाचा कलंक लावून
कोंडती माझ्या इच्छांचे खग….

म्हणे स्वप्नं विकतो आम्ही
सांगे नातेवाईक नी कुळाचार
म्हणे पंखांना बळ देतो आम्ही
देवा..पहा ओ ह्यांचा शिष्टाचार

आत्मक्लेषापासून होणार मुक्त
करेन आता मीच आत्मचिंतन…
चौकटीतल्या बाहेरचे जग पाहून
आत्मनिर्भर होवून दाखवेन…

सिंधू बनसोडे
इंदापूर.पुणे
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles