इलेक्शन आले हो
मतदारांनो जागे व्हा
सावध जरा राहा हो
मताचे मोल जाणावे
आता इलेक्शन आले हो…
डोळसपणे मतदान करू
खोट्या आश्वासनाला नका भुलू
जन हित दक्ष शासन आणून
लोकशाही देऊ फुलू
राजा असावा तत्वनिष्ठ
सतरा घरोबे करणारा
घर सोडून नसावा पळका
स्वार्थासाठी स्वाभिमान विकणारा
आरोप प्रत्यारोप नी
फोडाफोडी करील नेता
सभामंडपी अस्वासनांची
पिकेल पोळी खरी आता
लोभ नका बाळगू तुम्ही
मत आपले हे अनमोल
मताचा मारुन शिक्का
देऊ भ्रष्टाचाऱ्यांना धक्का
अस्मिता हत्तीअंबिरे
जि.परभणी
========