बहरला पळस; मृदुला कांबळे

बहरला पळस



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

निसर्गाचा ऋतू बदलला
नव पालवी मिरवते थाटात..
मोहक वृक्ष छटा फुलवूनी
रंगीत होते सृष्टी वसंतात…
शिषिराची ओसरली थंडी
अन् बहरला पळस वनी..
बोडकी झालेली वृक्षराजी
आली वाटे रंगात न्हाऊनी..
लाल केशरी मखमाली शालू नेसूनी..
नवयौवना उभी जणु रानात..
तारूण्याचा बहर पसरतो
वसंत संगे पळसात..
पळसाचे वृक्ष बहु उपयोगी
द्रोणे,पत्रावळी बनते पानांची..
फूलांची महती मिळते
आयुर्वेदात…
बालगोपालांची रंगपंचमी
साजरी होते पळसाच्या रंगांनी…
सरस्वती अन् कालिकेला
आवडती हे फूल तीन पानी
बिया,साल,फुले,पाने
किती करावे वर्णन..
रानातील हे पळस आहे
अत्यंत बहुगुणी..

मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles