घराणेशाही; अशोक मोहिते

घराणेशाही



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बनावे कर्तव्याचे शिलेदार
नको घराणेशाही आधार!
घराणेशाही स्वप्नांचे द्वार
घ्या खबरदारी वारंवार!

खरे प्रयत्न प्रसंग कुणावर
जिंकणे विजय स्वीकार!
कोरले सगळे हे मनावर
दिसले नक्की चमत्कार!

घराणेशाहीचा एक वार
करी नेतृत्वाला रे बेजार!
खरं कोण अन् खोटं जर
कधी कळलं नाहीच तर!

घराणेशाहीच रे वारसदार
मनासारखा हा मर्जीखोर!
सापडला तर ठरतो चोर
नाही तर चोरावर हा मोर!

घराणेशाही नसे कमजोर
वारसा हक्क असे बरोबर!
कुणाचा भरोसा कुणावर
घराणेशाही तत्वाचे द्वार!

असे एकहाती तलावावर
बेसावधपणे करती वार!
नाही व्यक्त स्वतंत्र विचार
घराणेशाही बनवी लाचार!

नसे पर्वा जीत किंवा हार
कधी बने सुई ही टोकदार!
टोचून काढती रक्ताची धार
घराणेशाही हुकूमशहा बार!

सगळे पार करी अधिका
मुक्ततीची नाती रे हद्दपार!
घराणेशाही भासे भस्मासुर
बिनबुडाचा देई बघ आधार!!

अशोक महादेव मोहिते
बार्शी,जिल्हा सोलापूर
==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles