रंगात तुझ्या
आभाळ तुझे जाहलो,रंगात
तुझ्या रंगलो,
सखे आजतरी एकदा निसंग होऊ या ना..
जरा दंग होऊ या ना?
नाद तुझा लागला, पाहण्या आतुर तुला..
प्रीतफुला आज जरा भेट होऊ दे ना..
जरा थेट होऊ दे ना..
क्षितीजावर दाटला,सांज रंग बघ चौफेर..
गंधभरी सुगंध लेऊन वात लहर येऊ दे ना..
जरा बहर येऊ दे ना..
शशी राजाचा रथ दौडत आला, गारवा घेऊन..
या मंदमंद वा-याभवती
पिंगा घालू या ना..
जरा झिम्मा खेळू या ना..
तू धरती हो गं राणी,मी पाऊसधारा होतो..
चिंब चिंब भिजूनी,बेभान होऊ या ना..
जरा देहभान हरवू या ना..
सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक व कवयित्री
===========