रंगात तुझ्या
रंगात तुझ्या रंगले,न्हावून निघाले मी,
प्रेमरंगी दंगले, सख्या झाले तुझी मी..
उधळीत रंग प्रेमाचा,खेळता तूजसवे,
उमगले ना काही, तुझ्यात गुंतले मी..
जीव जडला जीवावर, तुझा मजवर,
नकळत घडले,पण प्रेमात पडले मी..
हवाहवासा वाटे,सहवास मज तुझाच,
सांग आता तुच,तुजविण राहू कसे मी..
प्रितवेडी तुझी राधा,प्रेमाची ही बाधा,
इलाज औषधी गुण,तुझ्यात पाहे मी..
इंद्रधनुची सप्तरंगी,उधळण केली तू,
प्रेमरंगात भिजून,चिंब चिंब झाले मी..
ध्यानी मनी वसे, स्वप्नात दिसतोस तू,
त्यामध्ये ही सर्वस्व, अर्पून टाकले मी..
भुरळ पडते मला, पण आठवणीत तू,
तुझ्या अस्तित्वात,शोधते अस्तित्व मी..
बी एस गायकवाड
पालम, परभणी
===========