जागतिक बाल पुस्तक दिनी ग्रंथभेट, अत्रे प्रशालेचा उपक्रम’

जागतिक बाल पुस्तक दिनी ग्रंथभेट, अत्रे प्रशालेचा उपक्रम’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

(बिनधास्त न्यूज वृत्तसेवा)

पुणे: जगातला पहिला परिकथाकार मानला जाणारा ‘हँन्स ख्रिस्तीयन अँडरसन’ यांच्या जन्मदिनी जगभरात २ एप्रिल हा दिवस ‘जागतिक बाल पुस्तक दिन’ म्हणून साजरा होतो. या निमित्ताने सोमवार पेठेतील रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे प्रशालेत “बालपुस्तक दिन” बालगोपाळांच्या मेळ्यात उत्साहाने साजरा करण्यात आला.

डॉ. मनीष कुलकर्णी (अस्थिशल्य विशारद) यांनी आणि स्व. विद्या गोखले यांच्या कुटुंबीयांनी अत्रे प्रशालेस गोष्टींची पुस्तके उपलब्ध करून दिली. ही पुस्तके अत्रे प्रशालेतील विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली. वार्षिक परिक्षेनंतर उन्हाळी सुटीच्या काळात मुलांना वाचनाची गोडी लागावी या हेतूने त्यांच्या वयाला साजेशी अशी ही पुस्तके आहेत. त्यात जादूमयी दुनियेची सफर घडविणारी, परी, राक्षस, चेटकीण या विस्मयकारी विश्वाची सफर घडविणारी तसेच साहसी राजपूत्र, शूर राजकन्या आणि रामायण-महाभारतातील रोचक गोष्टींची ही पुस्तके मुलांना आवडतील अशी ज्ञान व मनोरंजनाने ठासून भरलेली आहेत.

अशा पुस्तकांमुळे मुलांचे भावविश्व समृध्द होते आणि कल्पनाशक्तीचा विकास होतो, म्हणून या वाचनाच्या आनंदाकडे नेण्याचा हा उपक्रम अत्रे प्रशालेत खास सूट्टीपूर्वी राबविण्यात येतो. तसेच सोमवार-मंगळवार पेठेतील इतर मुले व त्यांच्या पालकांसाठी गोष्टींचे अभिवाचन अत्रे प्रशालेतील मुलांकडून करून घेण्यात येते, अशी माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुश्री दीपमाला धायगुडे यांनी दिली. हरेश पैठणकर, केशव तळेकर, उत्तम साळवे व पालक प्रतिनिधींनी उपक्रमास सहकार्य केले.ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles